एम्पल अवॉर्ड्स ऑफ इन्स्पिरेशन सोहळा संपन्न

Santosh Gaikwad 20, 4-27 01:34 PM


मुंबई : समाजसेवक डॉ. अनिल काशी मुरारका आयोजित एम्पल अवॉर्ड्स ऑफ इन्स्पिरेशन सोहळा पार पडला. स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांना वाचविण्यासाठी शौर्य दाखविणारे  सैन्य व संरक्षण दलातील जवान पोलीस अग्निशमन दलातील जवान तसेच  २६ /११ हल्ल्यातील शौय नायक,  ट्रान्सजेंडर सशक्तीकरण, क्रिडा जगातील अपंग खेळाडू अशा समाजातील प्रेरणादायक व्यक्तींचा एम्पल अवॉर्ड्स ऑफ इन्स्पिरेशन देऊन सन्मान करण्यात आला यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून शहिद भगत सिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग, अभिनेता सूरज थापर, बॉबी खन्ना, राकेश श्रीवास्तव  उपस्थित हेाते.  संजीवनी वर्ल्ड स्कूल, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, दहिसर पूर्व येथे हा सोहळा पार पडला.