डॉ. हेगडे वाढदिवस चषक क्रिकेट स्पर्धा २६ मेपासून

Santosh Sakpal May 20, 2023 08:46 AM

मुंबई : लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित यंदाही शालेय मुलांची दुहेरी विकेट क्रिकेट स्पर्धा व आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा २६ मे ते ७ जून दरम्यान शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे डॉ. हेगडे वाढदिवस चषक शालेय मुलांची दुहेरी विकेट क्रिकेट स्पर्धा २६ मे रोजी शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनैल खेळपट्टीवर रंगणार आहे. दोन्ही स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत.


   आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा ७ जूनपर्यंत विजेतेपदाच्या डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषकासाठी होईल. रुग्णालयीन क्रिकेट संघांना मागील दशकापासून प्रोत्साहन देणारी आयडियल ग्रुपची परंपरा कायम राहण्यासाठी मुंबईचे माजी शेरीफ डॉ. जगन्नाथराव हेगडे देखील प्रयत्नशील आहेत. यावेळी रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे डॉ. इब्राहीम शेख व बॉम्बे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे संतोष रंगावकर यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी सहसचिव चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) अथवा प्रशिक्षक दिनेशसर (८५९१६ १२२७६) यांच्याकडे २१ मेपर्यंत संपर्क साधावा.


**************************************************