हनुमानजींचे जीवन देशाच्या विकासाच्या प्रवासात प्रेरणादायक : नरेंद्र मोदी

Santosh Gaikwad April 06, 2023 01:37 PM


दिल्ली : भारतीय जनता पक्षाचा ४४ वा स्थापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. हनुमानजींचे जीवन देशाच्या विकासाच्या प्रवासात  प्रेरणादायक आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअलपद्धतीने संवाद साधला. त्यांनी देशभरातील जनेतेला भगवान हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी   पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मोदी यांनी भाजपसाठी राष्ट्र प्रथम असल्याचं म्हटलं आहे.भाजपचं काम हनुमानासारख आहे, हनुमान स्व:साठी कधीच काही केलं नाही तसंच भाजप देशासाठी काम करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 'बजरंगबली हे भाजपचे प्रेरणास्त्रोत आहे. बजरंगबलीप्रमाणे भाजप देखेली शक्तीशाली होतोय.'जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आले, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत उचलून आणाला होता. याच प्रेरणेने भाजप देखील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील. जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले. त्याचप्रमाणे भारतातील कायदा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा भाजप देखील कठोर बनते असे मोदी म्हणाले.


काँग्रेसवर हल्लाबोल...

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची मानसिकता बादशाहाप्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परिवारवाद आणि वंशवादावरून देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. परिवारवाद ही काँग्रेसची खरी ओळख असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.