मुंबई प्रतिनिधी:
स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो लोकं उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब, विद्यार्थी आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.
मुंबईतील 'अक्षय चैतन्य' यासेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे. या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असेल.
या ऐतिहासिक प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली. या समारंभात भायखळ्याचे आमदार मनोज पांडुरंग जमसुतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर हरे कृष्ण चळवळीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अक्षय पात्र यांच्या हस्ते श्री अमितासन दासा यांनी याठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. याठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. इंद्रजित चड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर श्री. जी.ए. शिरसाट; मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे श्री. दिलीप शेडकर , टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर श्री. विपिन जैन; व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी श्री. रुस्तम गोदरेज जोशी; महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. संजय शेंडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे श्री. अमित नबीरा यांचा समावेश होता.
टीएलसी लीगल आणि व्हीव्हीएफ ग्रुप यांनी मुंबईतील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पोषक आहार पुरविण्याकरिता, स्वयंपाकघरातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला.
विपिन जैन(मॅनेजींग पार्टनर, टीएलसी लीगल)सांगतात की, मुंबईतील अक्षय चैतन्य सारख्या
सेवाभावी संस्थेसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. दररोज १००,००० लाभार्थ्यांना पोषक आहार पुरविण्याचे त्यांचे ध्येय्य य खरोखरच प्रेरणादायी आहे.
रुस्तम गोदरेज जोशी(अध्यक्ष आणि एमडी, टीएलसी लीगल) सांगतात की, मुंबईतील हजारो लोकांसाठी सुरक्षित आणि पोषक आहार बनवून ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या या अक्षय चैतन्यच्या मोहिमेला आमचा पाठिंबा असून या मोहिमेचा मला अभिमान वाटतो.