भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे भव्य कामगार मेळावा
April 30, 2025
*फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे यांच्या हकालपट्टीची मागणी*
April 30, 2025
राजयोग मार्ग" ब्रम्हाकुमारींचा जीवनावर आधारित लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंती, दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ ने होणार सन्मानित, सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरी कुलकर्णी यांना सन्मानित
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आज पुण्यातून हेलिकॉप्टर ने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला महाविद्यालय येथील हेलिपॅड वर उतरले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या सोबत आणलेल्या बॅगांची तपासणी करण्यासाठी हेलिकॉप्टर ची तपासणी केली यावेळी ना.रामदास आठवले यांच्या सोबत एकही बॅग नव्हती.होती ती केवळ सुक्या भेळ ची थैली.यावेळी ना.रामदास आठवले यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून हेलिकॉप्टर ची तपासणी आणि आपली ही तपासणी करण्याची तयारी दर्शवली.यावेळी हेलिकॉप्टर मध्ये कोणतीही बॅग नव्हती.फक्त भेळ आणलेली कागदी पिशवी होती.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या समवेत शिवसेना चे प्रवक्ते राजू वाघमारे; वैभव बोराडे;रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव परशुराम वाडेकर; प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे उपस्थित होते.
बाई गं Bai Ga | Official Teaser | Swapnil Joshi, Prarthana, Sukanya, Deepti, Aditi, Neha, Namrata
वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या ५ जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ? नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपटाचा भन्नाट टीझर आऊट
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का ? हे येत्या १२ जुलै ला आपल्याला 'बाई गं' ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या चित्रपटाचं धमाल टिझर आज रिलीझ झालय.
टिझर मध्ये स्वप्नील जोशी ला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे.
"बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.